By  
on  

प्रियंका चोप्रा आणि करिना कपूर घेणार करणसोबत कॉफी

तुम्हाला माहितच असेल करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये आत्तापर्यंत विविध इंटरेस्टींग जोड्यांनी हजेरी लावत धम्माल उडवून दिली. अक्षय कुमार-रणवीर सिंह, जान्हवी-अर्जून कपूर, सारा अली खान-सैफ अली खान, अजय देवगण-काजोल या अनेक हटके जोड्यांचे एपिसोड्स पाहताना मजा आली. वैयक्तिक आयुष्य असो किंवा सिनेमे यातील अनेक मजेशीर किस्से त्यांनी इथे शेअर केलं.

बॉलिवूडमध्ये दोन अभिनेत्रीचं कधीच पटत नाही, असं नेहमी म्हटलं जातं. पण अशा दोन आघाडीच्या अभिनेत्री जर करणच्या शोमध्ये दिसल्या तर अजिबात नवल वाटून घेऊ नका. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा या बॉलिवूडच्या लिडींग लेडीज लवकरच करणसोबत कॉफी घेताना पाहायला मिळतील. या दोघींमधील शीतयुध्दाची बॉलिवूडकरांना कल्पना आहेच. करण या दोघींमध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न या चॅटशोच्या निमित्ताने करेल असे समजते. मिडीया रिपोर्ट्सनुसार ऐतराज सिनेमापासूनच करिना व प्रियंकाचं कधीच पटलं नाही.

सूत्रांनुसार, डिसेंबरमध्ये कॉफी विथ करणच्या करिना व प्रियंकाच्या या एपिसोडचं शुटींग होणार आहे. पण डिसेंबरमध्येच देसी गर्ल प्रियंकाची निक जोनाससोबतची लगीनघाई असल्याने अद्याप तरी या शुटींगच्या तारखा कन्फर्म झालेल्या नाहीत. तसंच प्रियंकानेसुध्दा लग्नासाठी शोच्या तारखा करणला पुढे करण्याची विनंती केल्याचं समजतंय.

Recommended

PeepingMoon Exclusive