By  
on  

शाहरुखची सुहाना झाली ज्युलिएट, नाटक पाहून लेकीला दिली कौतुकाची थाप

बॉलिवूड किंग शाहरुख खान म्हणजे अभिनयाचा अनभिषिक्त सम्राट. त्याचं आपल्या तिन्ही मुलांवर प्रचंड प्रेम आहे, हे आपण जाणतोच. सध्या झीरो सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये बिझी असतानादेखील एसारके नुकताच लाडकी लेक सुहानाचं नाटक पाहण्यासाठी खास लंडनला पोहचला. हे नाटक पाहिल्यानंतर त्याने सोशल मिडीयावर एक भावूक पोस्ट केली.

एसआरकेने लेक सुहानासोबतचा एक फोटो आणि तिच्या नाटकातील पोस्टरचा एक सुरेख कोलाज इस्टांग्राम अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलंय. “ मी लंडनमध्ये आहे, माझ्या ज्युलिएटसह. सर्वांनीच अप्रतिम काम केलंय. माझ्यातर्फे या नाटकाच्या संपूर्ण टीमला खुप सा-या शुभेच्छा.” .

https://www.instagram.com/p/Bq0jC-kgWb5/

नुकत्यात लंडनमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात सुहाना आणि तिच्या काही मित्रपरिवारानं नाटक सादर केलं होतं. या नाटकात सुहाना ज्युलिएटची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होती.

सुहाना खान आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये येण्यास प्रचंड उत्सुक आहे. याबाबत तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तिचं नाटकात काम करणं व फोटोसेशन यासांरख्या गोष्टी पाहता तिने आता आपल्या पदार्पणासाठीची तयारी करायला सुरुवात केलीय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

काही महिन्यांपूर्वीच वोग मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकल्याबद्दल सुहाना खानला नेटिझन्सनी ट्रोल केलं होतं. फक्त सेलिब्रिटींची मुलगी असल्याने तिला हा मान मिळाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

 

Recommended

PeepingMoon Exclusive