नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधून आकाश ठोसरचा लुक आला समोर, पाहा Photos

By  
on  

सैराट सिनेमानंतर अभिनेता आकाश ठोसर परश्याच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्याच नाही तर महाराष्ट्राबाहेरही काना-कोप-यात पोहचला. परश्या आणि आर्चीच्या जोडीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तमाम तरुणींच्या हदयाची धडकन अशी ओळख आकाशने प्रस्थापित केली. आजही त्याच्या खुप मोठा चाहता वर्ग आहे. प्रत्येकालाच त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ची उत्सुकता असते. 

सैराटनंतर आकाश ठोसर महेश मांजरेकरांच्या 'फ्रेण्डशिप अनलिमिटेड' सिनेमात झळकला होता.नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमध्ये राधिका आपटेसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली होती. त्यानंतर सैनिकांवर आधारित आणखी एका वेबसिरीजमध्ये तो झळकला होता. आता  सैराटनंतर पुन्हा एकदा तो नागराज मंजुळे यांच्या झुंड या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येतोय, यात आकाशची एक जबरदस्त व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. याबाबत खुद्द आकाशनेच आपल्या सोशल मिडीयावरुन खुलासा केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

संभ्या असं त्याच्या  झुंड सिनेमातील व्यक्तिरेखेचं नाव असल्याचं कळतंय.. आकाशनं आज काही फोटो शेअर केले आहेत. 'अब कुछ बडा लफडा होगा! असं म्हणत आकाशनं फोटो शेअर केले आहेत. 

नागराज मंजुळे दिग्दर्शित महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भुमिका असलेला 'झुंड' सिनेमाची  सर्वांना उत्सुकता आहे. 'झुंड' द्वारे नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या  प्रदर्शनाची चाहत्यांना बरीच उत्सुकता होती. याच्या रिलीजच्या अनेक घोषणा झाल्या होत्या. पण अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाला मुहूर्त मिळाला आहे. येत्या 4 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

 नागपूरचे निवृत्त क्रीडाप्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. बिग बींची या सिनेमात मुख्य भूमिका असून नागराज मंजळे यांचं दिग्दर्शन आहे. या सिनेमाचा अजय-अतुल यांनी संगीत दिल्याने सिनेमातील संगीताचीही उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share