By  
on  

आला रे आला रोहित शेट्टीचा 'सिंबा'आला, पाहा अॅक्शनपॅक धमाकेदार ट्रेलर

रोहित शेट्टीच्या बहुचर्चित अॅक्शन पॅक सिंबाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर हा मच अवेटेड धमाकेदार ट्रेलर आज उलगडला आहे. रणवीर सिंह आणि सारा अली खान ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर या सिनेमानिमित्ताने एकत्र येत आहे.

सिंबा सिनेमाची सह निर्मिती दिग्दर्शक रोहित शेट्टी खुद्द धर्मा प्रोडक्शनसह करत आहे. या ट्रेलरमध्ये इन्सपेक्टर भालेरावच्या व्यक्तिरेखेत रणवीर सिंह एकदम तडफदार सुपरकॉप दिसतोय. अन्यायाविरोधात गुडांशी दोन हात करणा-या एका प्रामाणिक  मराठमोळ्या पोलिसाभोवती ही कथा फिरते आहे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर ही कथा साकारण्यात आलीय. रणवीरची नायिका म्हणून सारा अली खान सिनेमात झळकतेय. दोघांची केमिस्ट्री पाहायला मजा येणार ाहे.

सिंबा या सिनेमाला मराठमोळा टच असल्याने सिध्दार्थ जाधवसुद्धा भालेरावच्या टीममधला एक धडाकेबाज पोलिस अधिकारी आहे. यासोबतच आणखी एक सरप्राईज मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळालं ते म्हणजे अभिनेत्री वैदही परशुरामी हीची एक छोटी पण मह्त्त्वपूर्ण भूमिका. त्यामुळे हा ट्रेलर पाहणं खुप सुखद ठरतोय. तर अभिनेता सोनू सूद खलनाटक साकारतोय

https://www.instagram.com/p/Bq6r--RhmNR/

सिनेरसिकांसाठी 2018 हे वर्ष जाताजाता रोहित शेट्टीचे सुपर अॅक्शन हिरो सिंघम अजय देवगण आणि सिंबा रणवीर सिंहमुळे यांच्या एकत्र स्क्रीन शेअर करण्यामुळे हा सिनेमा ब्लॉकब्लस्टर ठरेल, यात शंका नाही.

https://youtu.be/PtFY3WHztZc

दरम्यान, हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून रोहित शेट्टी यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सरत्या वर्षाला निरोप देत रेकॉर्डब्रेक कमाई करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive