By  
on  

शूटींगसाठी बिग बी पोहचले नागपुरात; विमानतळावर जमली चाहत्यांची ‘झुंड’

अमिताभ बच्चन हे नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘झुंड’ सिनेमाच्या शूटींगसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. बिग बी चार्टर्ड प्लेनने नागपूर विमानतळावर दाखल झाले आणि त्यानंतर हॉटेलकडे रवाना झाले. पण बिग बी नागपुरात पोहचलेत ही बातमी वा-यासारखी पसरली आणि त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. सूत्रांच्या माहितीनुसार नागपुरातील एका शाळेत ‘झुंड’ चा सेट उभारण्यात आला आहे. सिनेमाचं नागपुरातील फारच कमी दिवसांचं शेड्यूल असल्याचं सांगण्यात येत आहे.

महानायक अमिताभ बच्चन आणि ‘सैराट’ दिग्दर्शक नागराज मंजुळे एकत्र सिनेमा करणार अशी बरीच चर्चा रंगली होती. याबाबतच्या अनेक उलट-सुलट बातम्यासुध्दा येत होत्या. पण अखेर बिग बींनी ट्विट करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

महत्त्वाचं म्हणजे काही महिन्यांपूर्वीच बिग बींनी नागराज मंजुळेचा हा सिनेमा सोडल्याच्या बातम्या येत होत्या. यासाठी बिग बींनी आपल्याकडे तारखा नसल्याचं कारण दिल्याचं बोललं जात होतं. पण अखेर त्या अफवाचं ठरल्या.

‘झुंड’ सिनेमात बिग बींसोबत काम करण्यास नागराज मंजुळेसुध्दा प्रचंड उत्सुक आहेत. ते स्वत: बिग बींचे खुप मोठे चाहते आहेत. एका क्रिडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत बिग बी आपल्यासमोर या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येतील. फुटबॉल या खेळाभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे.

सर्वांनाच आता बिग बी आणि नागराज मंजुळे हे समिकरण असलेल्या ‘झुंड’ सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive