By  
on  

‘काचा बादाम’चा फेम गायकाचा अपघात, प्रकृती चिंताजनक

‘काचा बादाम’ गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेले भुबन बड्याकार यांचा सोमवारी रात्री अपघात झाला आहे. इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालेले भुबन बडयाकार यांच्या कारला पश्चिम बंगालच्या बीरभूमी येथे अपघात झाला. त्यानंर भुबन यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्यानं प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या अपघाताच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचे चाहते त्यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive