अशी रंगली शाहरुख-सलमानची 'इश्कबाजी',पाहा 'झीरो'चं हे नवीन गाणं

By  
on  

'झीरो' हा शाहरुख खानचा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात प्रेक्षकांना एक आश्चर्यकारक आणि धमाकेदार सरप्राईज मिळालं ते म्हणजे इश्कबाजी हे नवं गाणं. फक्त हे गाणंच धम्माल नाही तर यात चक्क शाहरुख खानसोबत सलमान खानही थिरकताना पाहायला मिळतोय.

'झीरो' सिनेमाचं हे दुसरं गाणं असून यात सलमान खानने शाहरुखला अगदी लहान मुलाप्रमाणे उचलून घेतलंय. सुखविंदर सिंह आणि दिव्या कुमार यांचा स्वरसाज इश्कबाजी या गाण्याला लाभला आहे. आपली मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुलने याला संगीत दिलंय. प्रदर्शित होऊन अवघ्या काहीच तासांत या गाण्याला आत्तापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान, ‘झीरो’ सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक आनंद एल. राय आणि शाहरुख पहिल्यांदाच सोबत काम करत आहेत. शाहरुख यात कमी उंचीची व्यक्तिरेखा असलेले ‘बउवा सिंग’चे पात्र साकारत आहे.

 

https://youtu.be/eTls6-julhU

Recommended

Loading...
Share