By  
on  

'गली बॉय'मधील रॅपरचं झालं निधन, रणवीर सिंह आणि सिध्दांत चतुर्वैदी हळहळले

तरुणाईचा लाडका सिनेमा गली बॉयने लोकप्रियतेची अनेक शिखरं गाठली. आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि सिध्दांत चतुर्वेदी यांच्यासह सिनेमातील अनेक रॅपर प्रकाशझोतात आले. त्यांना चाहत्यांनी मनापासून दाद दिली. गली बॉय सिनेमामुळे लोकप्रिय झालेला रॅपर धर्मेश परमार उर्फ एमसी तोडफोड याचं निधन झालं आहे. तो फक्त 24 वर्षांचा होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swadesi (@swadesimovement)

मुंबईतील स्ट्रीट रॅपर कम्युनिटीमध्ये धर्मेश एमसी तोडफोड या नावानं प्रसिद्ध होता. त्याच्या गुजराती रॅपमुळे तो नावारुपास आला होता. रणवीर सिंहचा सुपरहिट सिनेमा 'गली बॉय'मध्ये धर्मेशने एका ट्रॅकसाठी रॅप साँग गायलं होतं. त्याचप्रमाणे हा प्रसिद्ध एमसी तोडफोड स्वदेसी (Swadesi Band) नावाच्या एका हिप-हॉप बँडचा भाग होता. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive