विवेक अग्निहोत्री म्हणतात, “लता मंगेशकर ‘द कश्मीर फाइल्स’साठी…”

By  
on  

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मिर फाईल्स अनेक कारणांनी चर्चेत आहेत. या चित्रपटावरुन दररोज वादंग निर्माण होत असून नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ चे दिग्दर्शक विवेक यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर या ‘द कश्मीर फाइल्स’साठी विशेष गाणं गाणार होत्या, मात्र करोनामुळे हे शक्य झालं नाही असा दावा विवेक अग्निहोत्रींनी केलाय.

एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले,  लतादिदींनी ते गाणं गावं अशी आमची इच्छा होता. त्यांनी बऱ्याच काळापूर्वी चित्रपटांमध्ये गाणं बंद केलं होतं. त्या पार्श्वगायनामधून निवृत्त झाल्या होत्या पण आम्ही त्यांना विनंती केलेली. त्यांचे पल्लवीशी (पल्लवी जोशी) फार चांगले संबंध होतं. त्यांनी आमच्या चित्रपटासाठी गाण्याची तयारीही दर्शवली. काश्मीर त्यांनाही फार प्रिय होता. करोनाची लाट ओसरुन गेल्यानंतर आपण गाणं गाऊ असं त्या म्हणाल्या होत्या,

Recommended

Loading...
Share