साऊथ चित्रपटांसाठी करण जोहर आहे लकी मॅस्कॉट

By  
on  

सुपर डुपर हिट बाहुबली 1 आणि 2 आणि गाजी अटॅक सारख्या चित्रपटांनंतर, करण जोहर आणि दक्षिण चित्रपटांमध्ये एक जादुई कनेक्शन असल्याचे दिसते, त्यांच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आहे.  अलीकडे, त्याने मुंबईत बहुचर्चित चित्रपट 'RRR' च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तोच चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर राज्य करत असल्याचे दिसतेय.  काल रात्री करणने रॉकिंग स्टार यश आणि संजय दत्त अभिनीत KGF2 चा भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रम देखील होस्ट केला.  दक्षिणेतील बहुतेक सुपरस्टार आणि चित्रपट निर्माते करणच्या उपस्थितीत त्यांच्या चित्रपटाचे कार्यक्रम करताना दिसून येतात आहे . यावरून असे वाटतेय जस  करण जोहर त्यांच्यासाठी लकी चार्म तर नाही आहे ना?

 करणने हिंदी भाषेत अनेक दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत.  इतकंच नाही तर तो सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत काम करत असून, करण  साऊथचा ब्लॉकबस्टर रोमँटिक चित्रपट ‘हृदयम’ देखील हिंदीत बनवणार असल्याची घोषणा ही  नुकतीच करण्यात आली आहे.

Recommended

Loading...
Share