By  
on  

ही महिला आहे आशियातील ‘सेक्सिएस्ट वुमन ऑफ द इअर’, प्रियांका पिछाडीवर...

भारतीय महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वत:ची मोहोर उमटवताना दिसतात. बॉलिवूडच्या अभिनेत्रींही भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आहे. अलीकडेच ‘सेक्सिएस्ट एशियन वुमन’ ही यादी प्रसिद्ध झाली. विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या तीन स्थानावर भारतीय स्त्रियांचच राज्य आहे. या यादीत पहिल्या क्रमांकाची सम्राज्ञी होण्याचा मान मात्र नवी नवरी दिपिका पदुकोणला मिळाला आहे. या यादीत दिपिकाने प्रियांका, कॅटरीना सारख्या सौंदर्यवतींना मागे टाकून पहिलं स्थान मिळवलं. आहे. या यादीत दुस-या क्रमांकावर आहे प्रियांका चोप्रा तर तिस-या स्थानावर आहे टि.व्ही. स्टार, स्टायलिश निया शर्मा. या पदासाठी दोन्ही नववधू प्रियांका आणि दिपिकामध्ये कायमच चुरस असते. मागील वर्षी दिपिकाला मागे टाकत प्रियांकाने हा किताब पटकावला होता. आता यावर्षी पुन्हा दिपिकाने बाजी मारली आहे.

 

हे वर्ष दिपिकासाठी अत्यंत चांगलं गेलं आहे. या वर्षाची सुरुवात ‘पद्मावत’च्या यशाने झाली तर वर्षाखेरीस लग्न आणि त्यानंतर मिळालेला हा बहुमान. त्यामुळे दिपिकाची ‘ पाचों उंगलियां घी मे’ अशी स्थिती झाली आहे.

 

लंडनमधील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिकामार्फत दरवर्षी ही यादी प्रसारित केली जाते. या यादीत आशियातील 50 सेक्सिएस्ट सेलिब्रिटींची निवड केली जाते.

Recommended

PeepingMoon Exclusive