By  
on  

बॉलिवूड अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम् यांचं निधन

बॉलिवूड अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम् यांचं निधन झालं आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ते आजारी होते. 10 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी त्यांची झुंज अयशस्वी ठरली. शिवकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर स्टारर सुपरहिट सिनेमा टू स्टेट्समध्ये त्यांनी आलियाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 

शिवकुमार सुब्रमण्यम यांनी विधू विनोद चोप्रा यांच्या ‘परिंदा’ आणि सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. या चित्रपटांशिवाय शिव कुमार ‘तीन पट्टी’, ‘प्रहार’ आणि राणी मुखर्जी स्टारर ‘हिचकी’ या चित्रपटातही दिसले होते. शिवकुमार सुब्रमण्यम यांनी ‘मुक्ती बंधन’ या टीव्ही शोमध्येही काम केले होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive