By  
on  

अमिताभ बच्चन नागपूरकरांच्या प्रेमाने भारावले, लिहिली भावनिक पोस्ट

कोणत्याही कलाकारासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चाहत्यांचं प्रेम. चाहत्यांचं असलेलं निस्सीम प्रेम हीच कलाकारांसाठी सगळ्यात मोठी शाबासकी असते. कलाकार नवखा असो किंवा ज्येष्ठ, चाहत्यांच्या प्रेमाने नेहमीच भारावून जातो.
असंच काहीसं घडलं आहे बिग बींच्या बाबतीत. बिग बी अमिताभा बच्चन सध्या शुटिंग निमित्त नागपूरमध्ये आहेत. त्यावेळी नेहमीप्रमाणेच चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती. या प्रेमाने बिग बी इतके भारावले की त्यांनी ट्वीट करून नागपूरकरांचे आभार मानले आहेत.

बिग बी नागपूरमध्ये सैराट फेम नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या पहिल्या वहिल्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी नागपुरात आहेत. त्यांनी नागपूर दौ-याबद्दल चाहत्यांना ट्वीट करून सांगितलं होतं. त्यामुळे नागपूरमधी फॅन्स बिग बींच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात होते.

https://twitter.com/SrBachchan/status/1071079895013474304

नागपूरमधील अमिताभ बच्चन आल्याचं कळताच ते उतरलेल्या हॉटेलच्या खाली, लॉबीमध्ये तसेच शुटिंग असलेल्या ठिकाणी फॅन्सची गर्दी दिसून आली.

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ पहिला हिंदी चित्रपट असल्याने प्रत्येकालाच त्याविषयी उत्सुकता आहे. हा चित्रपट एका फुटबॉल कोचच्या जीवनावर आधारित आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive