By  
on  

राणी मुखर्जीच्या 'मर्दानी'2 सिनेमाची घोषणा;2019 सुरु होणार शुटींग

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या 'मर्दानी' सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं होतं, प्रेक्षकांनासुध्दा तिच्या भूमिकेचं बरंच अप्रूप वाटलं. बॉक्स ऑफीसवरसुध्दा या सिनेमाने समाधानकारक पल्ला गाठला, खुद्द राणीला पण आपला हा कमबॅक सिनेमा सुपरहिट ठरल्याचा आनंद झाला. आता राणीच्या 'मर्दानी'चा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

राणीने मर्दानीमध्ये शिवानी शिवाजी रॉय या तडफदार महिला पोलिस अधिका-याची भूमिका वठवली होती. यात ती मानवी तस्करी करणा-यांना चांगलाच धडा शिकवते, अशा कथेवर आधारित होती. 'मर्दानी' सिनेमाची निर्मिती राणीचा पती आदित्य चोप्राने केली होती आणि आता सिक्वलची घोषणासुध्दा त्यांच्याकडून करण्यात आलीय. या सिक्वलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी गोपी पुथरन यांच्यावर आहे.

'मर्दानी'चियी सिक्वल संदर्भात डीएनए वृत्तपत्राशी बोलताना राणी म्हणाली, " 'मर्दानी' सिनेमा माझ्या खुप जवळचा आहे आणि कायमच राहील. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अनेकांनी मला या सिनेमाच्या सिक्वल कधी येणार याची वारंवार विचारणा केली. त्यामुळे 'मर्दानी'2 सिनेमाची घोषणा त्या सर्वांसाठी नक्कीच सुखद ठरणार आहे."

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive