रणबीर कपूर-आलिया भटची लगीनघाई, गणेशपूजा-मेहंदी -संगीत या लग्नविधींना सुरुवात

By  
on  

बॉलिवूडचं गोड कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नसोहळ्याकडे तमाम देशवासियाचं लक्ष लागून राहिल आहे. दीपिका -रणवीर, प्रियांका-निक, विराट-अनुष्का आणि विकी-कतरिना यांच्यानंतरच रणबीर-आलिया हे सर्वात चर्चित कपल. कपूर घराण्याच्या या शाही लग्नसोहळ्याच्या प्रत्येक अपडे्ट्स जाणून घेण्याची चाहत्यांना खुप उत्सुकता आहे. 

रणबीर-आलियाच्या लग्नापूर्वीच्या शुभ कार्यंना सुरुवात झाली असून हे सर्व विधी रणबीरच्या वांद्रे येथील निवासस्थानी पार पडतील. रिपोर्टस्नुसार ही जोडी १४ किंवा १५ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. 

सूत्रांनुसार आज १३ एप्रिलपासून लग्नापूर्वीच्या विधींना गणेशपूजनापासून सुरुवात होत आहे.  तर दुपारी मेहंदी आणि रात्री संगीत सोहळा थाटात पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. 

दरम्यान, रणबीर आणि आलिया यांच्या लग्नात त्यांचे काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील काही सदस्य हजेरी लावणार आहेत. त्याच्या लग्नात बेस्ट फ्रेंड अयान मुखर्जी, करण जोहर, आदित्य रॉय कपूर हे उपस्थित असणार आहेत. 

Recommended

Loading...
Share