तुझ्या चिमुकल्या हातांना धरण्यापासून ते तुला नवरीच्या रुपात पाहण्यापर्यंतचा प्रवास...आलियाच्या बॉडीगार्डची भावनिक पोस्ट

By  
on  

आलिया भट् आणि रणबीर कपूर या बॉलिवूडच्या सर्वात चर्चित कपलच्या शाही लग्नसोहळ्याची बरीच चर्चा रंगली. त्यांचे लग्नातले फोटो पाहण्यासाठी नेटकरी आसुसले होते. सर्वत्र या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. अशातच आलियाच्या लहानपणापासून  ते आत्तापर्यंत तिचा बॉडीगार्ड म्हणून काम करणारा सुनिल टालेकर यांनी तिच्यासोबतचा लग्नातला खास फोटो शेयर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. आलियाच्या कुटुंबाची फार पूर्वीपासून सुनिल सिक्युरिटी पाहतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sunil (@suniltalekar1977)

सुनिल टालेकरने इन्स्टाग्रामवर रणबीर-आलियासोबत लग्नातला फोटो शेयर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन देत म्हटलं आहे. तुझ्या चिमुकल्या हातांना धरण्यापासून ते तुला नवरीच्या रुपात पाहण्यापर्यंतचा प्रवास. मला हेच सांगायचंय की, माझं हदय हे आनंदाने भरुन गेलं आहे. आलियाने या फोटोंना लाईकही केलं आहे. 

याशिवाय सुनिलने काही दिवसांपूर्वी सोनी राजदान आणि आलियाचा फार जुना फोटो शेयर केला होता. यात चिमुकली आलिया फारच गोड दिसतेय. तेव्हापासून सुनिल हे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेतायत. हे पाहायला मिळालं. 

दरम्यान, 14 एप्रिल 2022 रोजी आलिया भट ही कपूर घराण्याची सून झाली. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला मुंबईमध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर लगेचच आलियानं आपल्या विवाहसोहळ्याचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली.

Recommended

Loading...
Share