कॉमेडी क्वीन भारती सिंह 'चंद्रमुखी'च्या प्रेमात, व्हिडीओ शेयर करत म्हणते ''बाई गं''

By  
on  

चंद्रमुखी’. आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती,‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या बहुचर्चित मराठी सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या  भेटीला आला आहे.  तमाशा कलावंत चंद्रा साकारणारी अमृता खानविलकर आणि दौलत देशमाने यांच्या  व्यक्तिरेखेतील आदिनाथ कोठारे यांच्या अनोख्या प्रेमकहाणीची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. सध्या सर्वत्र आगामी चंद्रमुखी या सिनेमाचीच जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक कलाकार या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव करताना पाहायला मिळतायत. हिंदीतील प्रसिध्द कॉमेडीयन भारती सिंहनेसुध्दा चंद्रमुखीसाठी इनस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेयर केली आहे. 

चंद्रमुखीच्या इन्स्टाग्राम पेजवर नुकतंच भारती सिंहचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारती सिंहचे आभार मानले आहेत. तू व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आणि तुझ्या सहकार्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तुझे हे शब्द फार मोलाचे आहे. तुला आणि तुझ्या बाळाला खूप आशीर्वाद, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.

या व्हिडीओद्वारे भारती सिंहने चंद्रमुखी चित्रपटाचे तसेच लावणी किंग आशिष पाटील याचे खास कौतुक केले आहे. “मला फार आनंद होत आहे की माझा मित्र आशिष पाटील याचे चंद्रमुखी या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे. आवडते म्यूझिक डायरेक्ट अजय अतुल यांचे हे गाणे आहे. चंद्रमुखी या चित्रपटात त्याने लावणीच्या ज्या अदाकारी केल्या आहेत त्या पाहिल्यानंतर खरंच खूप मस्त वाटलं. ‘बाई गं’ हे गाणं नक्की पाहा. चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.” असे भारती सिंह म्हणाली.

 

Recommended

Loading...
Share