By  
on  

‘झिरो’चं कथानक अपूर्ण गोष्टींमध्येही आनंद शोधणा-यांसाठी: शाहरुख खान

शाहरुख खानचा महत्त्वाकांक्षी सिनेमा ‘झिरो’चा ट्रेलर अनेकांची उत्सुकता वाढवत आहे. शाहरुखलाही या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत. शाहरुख, कतरिना आणि अनुष्का या सिनेमाच्या निमित्ताने ब-याच वर्षांनी एकत्र येत आहेत.

शाहरुख झिरोच्या कथानकाविषयी बराच उत्साहात आहे. त्याच्या मते, ‘झिरोमध्ये अपूर्णतेमधील परफेक्शन साजरं केलं आहे. या सिनेमातील तिन्ही व्यक्तिरेखा त्यांच्या आयुष्यात अपूर्ण आहेत. तरीही आयुष्य साजरं करताना दिसतात.

आपण परफेक्शनच्या पाठी धावताना स्वत:कडे लक्ष द्यायचं विसरून जातो. हातात जे आहे त्यावर प्रेम करायचं सोडून पळत्याच्या पाठी लागण्यातच आपण वेळ वाया घालवत आहोत.’

शाहरुख या सिनेमात बउवा सिंग ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेची उंची बरीच कमी असते. अशा वेळी त्याच्या आयुष्यात येणा-या दोन स्त्रिया त्याच्यात कसा बदल घडवतात हे या सिनेमात पाहणं रंजक ठरणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive