By  
on  

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पडली 'तैमूर'ची भुरळ,लवकरच करणार सिनेमा

सैफ करिनाचा लाडका तैमूर अली खान याच्या क्यूटनेस ओव्हरलोडेडमुळे त्याच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठलाय. तैमूरसारखा हुबेहुब दिसणारा बाहुला बाजारात आल्यानंतर आत्ता त्याच्यावर सिनेमा बनणार आहे. तैमूरची भुरळ चक्क आता प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पडलेली दिसतेय.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार मधुर भांडारकर यांनी सिनेमासाठी ‘तैमूर’ या नावाची नोंदणी केली आहे. आता या नावाने तो खरंच सैफचा मुलगा ‘तैमुर’ याच्यावर सिनेमा काढणार की काहीतरी वेगळाच विषय असणार हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

https://www.instagram.com/p/BrVj2azAyh9/

स्टारकिड्समधला तैमूर हा सुपरस्टार आहे.  सध्या तैमूर फक्त फोटोग्राफर्स आणि प्रसिध्दी माध्यमांच्या गराड्यात असतो. त्यामुळे त्याच्यासाठी सिनेमात काम करणं किंवा कॅमे-याला सामोरं जाणं ही काही नवीन गोष्ट नाही. सोशल मिडीयावरसुध्दा त्याचाच बोलबाला असतो. त्याच्या नावाने अनेक फॅन पेजेस, अकांऊट्स चालवले जातात आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो.

https://www.instagram.com/p/BqAednVAnna/

Recommended

PeepingMoon Exclusive