By  
on  

प्रियांका आणि करीनामधलं भांडण मिटलं एकदाचं, कामी आली करणची मध्यस्थी

बॉलिवूडकर एकमेकांचे मित्र कमी आणि स्पर्धकच जास्त असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे कोण कधी मित्र बनेल आणि कोण कधी शत्रू बनेल हे सांगता येत नाही. त्यातही दोन अभिनेत्रींमधील भांडण म्हणजे विशेष बाब असते.

दोन अभिनेत्रींमधील कॅटफाईटच्या बातम्या चवीने चघळल्या जातात. प्रियांका आणि करीना या दोघींच्यातील कॅटफाईटच्या चर्चा बॉलिवूडने बरेच दिवस चघळल्या. पण आता या दोघींमधील भांडणं संपणार आहेत. हे भांडण संपायला शिष्टाई केली आहे ती करण जोहरने.

करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये या दोघीही पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. त्यामुळे या दोघींनी यापूर्वी ऐतराज या सिनेमात एकत्र काम केलं आहे खरं पण कोणत्याही चॅटशो मध्ये एकत्र येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असेल.

Recommended

PeepingMoon Exclusive