By  
on  

रोहित शेट्टी या सिनेमाद्वारे धुमाकुळ घालण्यास पुन्हा सज्ज

एका फिल्म फ्रेंचाईजीचे अनेक भाग रिलीज होणं हे हॉलिवूडमध्येही सर्रास घडतं. पण आता बॉलिवूड्करांनीही ही किमया साधली आहे. सलग चार भाग प्रेक्षकांसमोर आणणारी ‘गोलमाल’ या फ्रँचाईजीचा आता पाचवा भाग प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास येणार आहे.
अ‍ॅक्शन कॉमेडी या प्रकारात मोडत असलेल्या या सिनेमाच्या चारही भागांना प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. आता रोहितने गोलमाल ५ च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं ठरवलं आहे.
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सिंबामधील ‘आंख मारे’ या गाण्यामध्ये अरशद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कुणाल खेमु यांनी हाताची पाच बोटं दाखवत आगामी भागासंबंधी घोषणा केली होती.
यावर रोहित शेट्टीचं मत जाणून घेतलं असता तो म्हणाला, गोलमाल ५ येणार हे खरं असलं तरी त्याच्या निर्मितीला अजून दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. गोलमाल ४ ला मिळालेली प्रसिद्धी पाहता आमच्या टीमवरची जबाबदारी वाढली आहे. प्रत्येक गोलमालमध्ये रोहीत एक सरप्राईज कंपोनंट आणत असतो. गोलमाल ५ मध्ये तो प्रेक्षकांना काय देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive