By  
on  

तैमुर निघाला सुट्टीला, या ठिकाणी करणार वाढदिवसाचं सेलिब्रेशन

लहान मुलांच्या बाललीला प्रत्येकालाच मोहवतात. त्यातही ते मुल तैमुरसारखं स्टार किड असेल तर त्याचं कौतुक विशेष असतं. असंच काहीसं झालंय सैफ आणि करीना यांच्या तैमुरबाबत. तैमुर कुठेही असला तरी प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्याच्या गोंडस दिसण्याने तो कॅमेराचं लक्ष वेधून घेतो.


तैमुर अलीकडेच विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी नेव्ही ब्ल्यु कलरचा टी शर्ट घातलेला तैमुर पापा सैफच्या खांद्यावर बसला होता. आई करीना आणि बाबा सैफसोबत तैमुरची स्वारी आफिक्रेच्या दौ-यावर निघाली होती. तैमुरच्या दुस-या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करीना आणि सैफने यावेळी आफ्रिकेत करायचं ठरवलं आहे.
त्यासाठीच काही दिवसांपूर्वी करीनाने त्याच्या प्री बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला यश आणि रुही जोहर, लक्ष्य कपूर, अब्राम खान, निशा कौर वेबर यांच्यासह अनेक स्टार किड्सनी हजेरी लावली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive