अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राच्या 'केसरी'चा हा दमदार लूक तुम्ही पाहिला का?

By  
on  

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या 'केसरी' या आगामी सिनेमाचा दमदार फर्स्ट लूक नुकताच उलगडला आहे. केसरी सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं असून या सिनेमातील दोगांच्या लूकचा एक फोटो परिणीतीने आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर शेअर केला आहे. या सिनेमाचं शूटींग जोधपूरमध्ये पूर्ण करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

केसरीच्या या पोस्टरवर अक्षय कुमार एका शीख योध्द्याच्या भूमिकेत दिसत असून परिणीतीसुध्दा खुपच रिअल व्यक्तिरेखेत पाहायला मिळतेय.अक्षय कुमार हा करण जोहरसोबत मिळून या सिनेमाची निर्मिती करत आहेत. हा बिग बजेट सिनेमा असल्याचं बोललं जात असून या सिनेमाच्या ग्राफीक्सवरसुध्दा बरेच पैसे खर्च करण्यात आले आहेत.

https://www.instagram.com/p/BregpGyAo6h/

'केसरी' सिनेमात अक्षय कुमार हवालदार ईशर सिंहची व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेसाठी त्याने खास घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं आहे. सारागढीच्या युध्दावर आधारित हा सिनेमा असून 21 मार्च 2019 रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.instagram.com/p/BrehhOdHgSL/

Recommended

Loading...
Share