By  
on  

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा रिसेप्शनमध्ये दिसला पांरपारिक अंदाज

सध्या सगळीकडे लग्नाची धुमधाम सुरु आहे. सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यांचे क्षण पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं न फिटतं तोच आणखी एका विवाह सोहळ्याची खबर मिळाली.
हा सोहळा होता बॅट्मिंटन कोर्टावरील राजा आणि राणीचं. सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या स्पोर्ट कपलने अगदी साध्या समारंभात एकमेकांना आयुष्यभर सोबत करण्याचं वचन दिलं.


पण या दोघांचा विवाहसोहळा जितका साधा झाला तितकंच रिसेप्शन शानदार झालं. हैद्राबादमध्ये पार पडलेल्या या रिसेप्शनमध्ये सायना खरोखरीच एखाद्या राणीसारखी दिसत होती. तिने घातलेला नेव्ही ब्ल्यु कलरचा लेहेंगा आणि पीच कलरची चुनरी तिच्या सौंदर्यात भरच घालत होती. तर कश्यपने तिच्या लेहेंग्याशी मॅचिंग असलेली शेरवानी घातली होती. त्याने खांद्यावरून घेतलेल्या शालीमुळे एकुणच रॉयल लूक मिळत होता.


सायना आणि कश्यप एकमेकांना गेली दहा वर्षं डेट करत होते. सायना आणि कश्यपची ओळख गोपीचंद अकादमीमध्ये सरावादरम्यान झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण या दोघांनीही कधीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती.
पण काही दिवसांपूर्वी सायनाने कश्यपसोबत नातं जाहीर करताना लग्नाबद्द्लही सोशल मिडियावरून जाहीर केलं होतं. या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी नागार्जुन, रकुलप्रीत हे कलाकार उपस्थित होते.

Recommended

PeepingMoon Exclusive