By  
on  

तैमूरच्या वाढदिवसानिमित्त सैफ करिनाचा असा आहे स्पेशल प्लॅन

सैफ-करिनाचा लाडका मुलगा तैमूरच्या याच्या प्रसिध्दीत दिवसेंदिवस वाढ होतानाच दिसतेय. कधी तैमूर सारखा दिसणारा चा बाहुला बाजारात येतो तर कधी तैमूरचा सिनेमा काढण्याची घोषणा होते. मात्र नेहमीच फोटो जर्नलिस्ट आणि प्रसिध्दी माध्यमांच्या गराड्यात वावरणा-या तैमूरच्या वाढदिवसानिमित्त त्याची झलक कोणााला मिळू शकणार नाही.

तैमूर यंदा आपला दुसरा वाढदिवस साजरा करण्याकरिता आपल्या आई आणि बाबांसोबत आफ्रिकेला गेला आहे. खरंतर सैफ आणि करिनाला एका जाहिरातीच्या शुटींगसाठी आफ्रीकेला जावंच लागणार होतं. म्हणूनच हे शूटींग संपवून तिथेच लाड्क्या तैमूरचा वाढदिवस साजरा करण्याचा त्यांनी प्लॅन आखला. एका मुलाखतीत सैफने सांगितलं होतं, "की अॅड शूटसाठी आम्ही केप टाऊना जाणार असून नंतर तिथेच आम्ही टीमचा बर्थ डे सेलिब्रेट करु." तसंच घोडेस्वारी आणि बिग कॅट्स पाहण्याचा आनंद हे त्रिकोणी कुटुंब घेणार आहे.

नुकताच आफ्रीकेतील बीचवर आई करिनासोबत फिरतानाचा तैमूरचा बीच लूक पाहायला मिळाला होता.

पण सेलिब्रेशन मात्र २० तारखेला म्हणजेच ख-या वाढदिवसादिवशी न करता ७ तारखेला ठेवण्यात. या जाहिरात शूटींगमुळेच असल्याने करीना आणि सैफने वेळेआधीच लाडक्या टीमचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive