मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर रितेश देशमुख ट्विट करत म्हणाला...

By  
on  

महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय नाट्याचा अंक संपला आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. दरम्यान त्यांच्या या शपथविधीनंतर जनसामान्यांपासून कलाकार मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता रितेश देशमुख याने देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत दोन ट्विट केले आहेत. त्यातील एका ट्विटमध्ये रितेशने एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर केला आहे. "श्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा", असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.

तर रितेश देशमुखने देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने फडणवीसांचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज आपण शपथ घेतली. आपले खूप खूप अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा", असे ट्विट रितेश देशमुखने केले आहे.

 

 

दरम्यान रितेश देशमुख हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ शेयर करत असतो. त्याचबरोबर काही सामाजिक, राजकिय घटनांवर देखील तो व्यक्त होत असतो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची एक खास पोस्ट देखील त्याने शेयर केली होती.

Recommended

Loading...
Share