By  
on  

प्रसिद्ध गायक भूपेंद्र सिंह यांचे निधन

 हिंदी चित्रपट संगीतात पार्श्र्वगायक म्हणून प्रसिद्ध असणारे  गायक भूपेंद्र सिंह यांचे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास क्रिटी केअर रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

 किसी नजर को तेरा इंतजार आज भी है, दिल धुंडता है, नाम गुम जायेगा, एक अकेला इस शहर मे, जिंदगी मेरे घर आना ते अगदी अलिकडे सत्या चित्रपटातील बादलों को काट काट कर या गाण्यापर्यंत खास त्यांच्या आवाजातील गाणी अजूनही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

गेली काही वर्षे ते चित्रपट संगीतापासून दूर होते. हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात तीन दशकांची कारकिर्द गाजविणारे भूपेंद्र सिंह प्रसिद्धीच्या झगमगाटापासून थोडे अंतर राखून होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive