रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटची सोशल मिडीयावर गरमा गरम चर्चा !

By  
on  

आपल्या अभिनयाबरोबरच अतरंगी सतरंगी फॅशन सेन्ससाठी बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंह ओळखला जातो. एखादा अवॉर्ड सोहळा असो,  कुठल्याही लॉंचचा मोठा कार्यक्रम किंवा मग एअरपोर्टवर स्पॉट झाल्यावरसुध्दा सगळ्यांच्याच नजरा रणवीरकडे वळतात. हटके फॅशनमुळे तो नेहमीच सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो. ट्रोलर्सच्या तर तो निशाण्यावरच असतो. ह्यावेळेससुध्दा तो एका गरमागरम फोटोशूटमुळे चर्चेत आलाय, पण ट्विस्ट असा आहे कि यावेळी कपडे नाही तर कपड्याविना फोटोशूटकेल्यामुळे प्रसिध्दी झोतात आलाय.
 

‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी रणवीर सिंहने नेकेड (पूर्ण नग्नावस्थेत) फोटो शूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपड नसून तो पोज देताना दिसत आहे. रणवीरचं हे फोटोशूट अमेरिकी अभिनेता बर्ट रेनॉल्डच्या गाजलेल्या न्यूड फोटोशूटची आठवण करुन देणारं असल्याचं अनेकांनी म्हटलंय. काही फोटोंमध्ये रणवीर केवळ अंतर्वस्त्रावर दिसत आहे. न्यूड  फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DietSabya® (@dietsabya)

रणवीर सिंहने बर्ट रेनॉल्डच्या सन्मानार्थ (?) पेपर मॅगझीनसाठी हे फोटोशूट केलंय, असं म्हणत डाएट सब्या नावाच्या व्हेरिफाइड इस्टाग्राम पेजवरुन रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आलेत. याचबरोबर रणवीरच्या मुलाखतीमधील काही वाक्यंही यासोबत शेअर करण्यात आली आहे. 
 

Recommended

Loading...
Share