प्रियांका-निक LA येथे देणार का आपल्या मित्रांसाठी ग्रॅंण्ड पार्टी?

By  
on  

प्रियांका आणि निक यांच्या लग्नाची धामधूम काही संपण्याचं नाव घेईल असं दिसत नाही. यंदा वर्षाअखेर आपला विदेशी प्रियकर अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास याच्यासोबत जोधपूर येथील उमेद भवन येथे लग्नगाठ बांधल्यानंतर  दिल्ली आणि मुंबईत असे आत्तापर्यंत एकूण तीन जोरदार रिसेप्शन दिले आहेत. तसंच यासोबतच देसी गर्ल आपल्या वर्क कमिट्समेंटसुध्दा पूर्ण करताना पाहायला मिळते. पण या नवपरिणीत जोडप्याने आपल्या हॉलिवूडच्या मित्रपरिवारासाठी परदेशात एकही पार्टी होस्ट केली नाही.

मिड-डे या वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, स्विर्झंलॅंण्ड येथे हनिमून साजरा केल्यानंतर प्रियांका मुंबईत परतेल आणि द स्काय पिंकची शुटींग पूर्ण करेल. त्यानंतर जानेवारी अखेरीस लॉस एंजलस येथे निकला जॉईन करुन ही देसी गर्ल हॉलिवुडच्या सर्व मित्र-परिवाराला जंगी पार्टी देण्याच्या बेत आखतेय.

महत्त्वाचं म्हणजे प्रियांकाची टीम हॉलिवुड पार्टीची तयारी करत असून वेन्यूची निवड करतायत. या खास रिसेप्शनमध्ये रॉयल घराण्याची सून आणि ब्रिटनचा ड्यूक अ‍ॅण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्कल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर बेवॉचमधील प्रियांकाचा कोस्टार 'द रॉक'सुद्धा उपस्थित राहू शकतो.

Recommended

Loading...
Share