'भाभीजी घर पर है' मधील अभिनेत्याच्या निधनानंतर १ वर्षाचा मुलगा आणि पत्नीची अवस्था बिकट

By  
on  

'भाबी जी घर पर हैं' या हिंदी  मालिकेतील मलखान याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. मालिकेत मलखान ही भूमिका दीपेश भान साकारत होते. आपल्या अभिनयाने सर्वांना हसवणारा अभिनेता दीपेश भान आता या जगात नाहीत. २३ जुलै रोजी सकाळी त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. २०१५ साली त्यांनी या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान दीपेश यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या एका वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

२०१९ मध्ये दीपेश भान यांचं लग्न झालं होतं. त्यांची पत्नी तशी लाइमलाइटपासून दूरच राहिली आहे. मात्र दीपेश यांनी अनेकदा त्यांच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटोस् सोशल मीडियावर शेअर केलेत. दरम्यान दीपेश यांना अवघ्या १ वर्षांचा मुलगा असून इतक्या लहान वयात त्याने पितृछत्र गमावल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर अवघ्या तीन वर्षातच आपला साथीदार सोडून गेल्यानंतर त्यांच्या पत्नीची काय अस्वस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही.

दीपेश भान यांच्या निधनाची बातमी कळताच सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली असून त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचं कसं होणार म्हणत सर्वचजण चिंता व्यक्त करत आहेत.

Recommended

Loading...
Share