By  
on  

दिपिका पदुकोण बनली निर्माती, या सिनेमाची निर्मिती आणि अभिनयाची धुरा सांभाळणार

अभिनेत्री दिपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाला येत्या काही दिवसात एक महिना पूर्ण होईल. पण लग्नाला अवघे काहीच दिवस झाले असताना ही जोडी पुन्हा कामात बिझी झाली आहे. रणवीर त्याच्या सिंबाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाला आहे. तर दिपिका तिच्या आगामी सिनेमाच्या तयारीत गुंतली आहे.

विशेष म्हणजे लग्नानंतर दिपिकाने करीअरमध्येही एक नवीन वळण घेतलं आहे. दिपिका आता निर्मितीच्या क्षेत्रात उतरली आहे. दिपिका ‘छपाक’ या सिनेमातून निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सिनेमासाठी मेघना गुलजार तिची सहनिर्माती आहे. या सिनेमात दिपिका अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हाव्हर लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारत आहे.

लक्ष्मी अगरवाल हिच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. पण या संकटासमोर हार न मानता लक्ष्मी अशा हल्ल्यांनी पीडित मुलींसोबत उभी राहिली. तिची कहाणी छपाकमध्ये आहे. दिपिकासोबत या सिनेमामध्ये विक्रांत मेसी काम करणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive