नवपरिणीत प्रियांका-निक जोनासने लंडनमध्ये कुटुंबियांसोबत घालवला वेळ

By  
on  

वर्षाअखेरच्या महिन्यात जयपूरमध्ये लग्नाचा बार उडवल्यानंतर नवपरिणीत जोडपं निक आणि प्रियांकाने दिल्लीमध्ये एक रिसेप्शन दिलं. दिल्लीतील रिसेप्शन झाल्यानंतर हे जोडपं शॉर्ट हनीमूनसाठी ओमानला जाऊन आलं.

ओमानहून मुंबईला आल्यानंतर प्रियांकाने आणि निकने मुंबईमध्ये दोन रिसेप्शन होस्ट केले. या दोन्ही रिसेप्श्नमध्ये प्रियांका आणि निकमधील केमेस्ट्री दिसून आली.

पहिलं रिसेप्शन प्रियांकाचे पाहुणे आणि मीडियासाठी होतं तर दुसरं रिसेप्शन बॉलिवूडसाठी होतं. या रिसेप्शनमधील फोटोंवर नेटिझन्सनी लाईक्सचा वर्षाव केला.

प्रियांका आणि निक आता लंडनमध्ये असून जोनास कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत ज्यो जोनास, फ्रॅंकी जोनास आणि सोफी टर्नर हे देखील आहेत. त्यांचे डिनरवेळी फोटो सोशल मिडियात दिसत आहेत.

प्रियांकाने जानेवरी अखेरीस लॉस एंजेलिस हॉलिवूडच्या मित्र मैत्रिणींसाठी रिसेप्शन ठेवलं आहे.

 

Recommended

Loading...
Share