विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे ची लोकल वारी, चित्रपटाचे दुसरे गाणे 'वाट लगा देंगे' ही आज झाले रिलीज

By  
on  

बॉलिवूड मध्ये पदार्पण करणारा युवा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे चा चित्रपट लायगर याचे सध्या जोरदार प्रमोशन चालू आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषेत रिलीज होणारा हा पॅन इंडिया चित्रपट आणि यातले कलाकार हा सगळ्यांचा उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

आज सकाळी विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी फिल्म प्रमोशन साठी जाताना महागड्या गाड्या सोडून चक्क मुंबईच्या लोकल ट्रेन चा पर्याय निवडला. खार स्टेशन वरून लोअर परेल पर्यंत ह्या दोघांनी ट्रेन ने प्रवास केला.

तसेच ह्या चित्रपटाचे दुसरे गाणे "वाट लगा देंगे" ही आज रिलीज करण्यात आले आहे.  फिल्म चा ट्रेलर, अकडी पकडी आणि आता वाट लगा देंगे हे गाणे पाहता प्रत्येक गटातील प्रेक्षक तसेच सर्व सामान्यांनाही आकर्षित करणास खरा ठरण्याची अपेक्षा नाकारता येत नाही.

पुरी जगन्नाध निर्देशित लायगर ह्या चित्रपटात माईक टायसन ही विशेष भूमिकेत झळकणार असून हा चित्रपट २४ ऑगस्ट रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

Recommended

Loading...
Share