'महाभारत' फेम अभिनेते रसिक दवे यांचं दुःखद निधन ; वयाच्या ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By  
on  

टीव्ही जगतातून नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे. हिंदी-गुजराती चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले अभिनेते रसिक दवे यांचं वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले आहे. किडनी निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. गेली १५ दिवस त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

रसिक यांनी 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे यांच्याशी लग्न केले. दवे यांच्या मागे पत्नी अभिनेत्री केतकी दवे, मुलगी रिद्धी आणि मुलगा अभिषेक आहेत. दवे हे प्रसिद्ध टीव्ही अभिनेते होते. हिंदी आणि गुजराती रंगभूमी आणि टीव्ही शोवरील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. संस्कार धरोहर अपनों की, सीआयडी, कृष्णा सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकेत त्यांनी काम केलं होतं. मात्र, महाभारतातील नंद हीच त्यांची कायम ओळख म्हणून राहिली. काही दिवसांपूर्वी केतकी दवे आणि ते नच बलिए या टीव्ही शोवर दिसले होते.

दरम्यान 'भाभीजी घर पर हैं' मधील मलखानची भूमिका साकारणारा अभिनेता दीपेश भानच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अजून सावरले नाहीत की अजून एका निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

Recommended

Loading...
Share