'रक्षाबांधन'च्या प्रमोशन नंतर खिलाडी अक्षय कुमारने पुण्याच्या 'श्रीमंत मिसळ'वर मारला ताव!

By  
on  

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारच्या 'रक्षाबंधन' या सिनेमाच्या रिलीजला फक्त एक आठवडा शिल्लक असताना अक्षय कुमार, निर्माता आनंद एल राय आणि इतर कलाकारांसह चित्रपटाची टीम सिनेमाच्या प्रमोशनसाठी धावत आहे. नुकताच इंटरकॉन्टिनेंटल दुबई फेस्टिव्हल सिटी येथे ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर, रक्षाबंधनच्या टीमने रक्षाबंधन सणाच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ३ ऑगस्टला पुणे शहराला भेट दिली.

अक्षय कुमार, आनंद एल राय आणि कलाकारांचे पुणेकरांनी, विशेषत: श्री बालाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनापासून स्वागत केले होते, यानंतर चित्रपटाच्या टीमने पुण्याच्या प्रसिद्ध श्रीमंत मिसळ पाव केंद्राला भेट दिली आणि तिथल्या लोकप्रिय स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी अक्षय आणि इतर कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. 

आनंद एल राय दिग्दर्शित, आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा यांनी झी स्टुडिओज, अलका हिरानंदानी आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित, भुमी पेडणेकर, अक्षय कुमार, नीरज सूद, सीमा पाहवा, सादिया खतीब, अभिलाष थापलियाल, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत आणि सहेजमीन कौर यांचा समावेश असलेला रक्षाबंधन सिनेमा येत्या १२ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

Recommended

Loading...
Share