'आम्हीच नेहमी चुकीचे असतो आणि तुम्ही बरोबर' म्हणत पापराझींवर भडकली अभिनेत्री तापसी पन्नू

By  
on  

बॉलिवूड मधली बहुचर्चित अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या परखड स्वभावामुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत राहते. नुकतंच एका कार्यक्रमात तापसी पापराझींवर भडकली. कार्यक्रमाला उशिरा पोहोचलेल्या तापसी पन्नूला पापराझी पोज देण्यास फोटोग्राफर्स थांबवत असताना पापराझींना पोद देण्यास तिने नकार दिला तेव्हा पापराझी आणि तापसी पन्नू यांच्यात झालेल्या वादानंतर तापसी भडकली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

सोमवारी संध्याकाळी तापसीने तिच्या आगामी ‘दो बारा’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान तापसी कार्यक्रमासाठी आत जात असताना फोटोग्राफरने तिला थांबवत पोज देण्यासाठी सांगितले, तुला खूप उशीर झालाय असं म्हणाले. यावर तापसी "मला जे करायला सांगितले आहे तेच की करत आहे, तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोललात तर मी सुद्धा तुमच्याशी व्यवस्थित बोलेन. असं तापसी म्हणाली. 

दरम्यान इतर फोटोग्राफर्स मध्यस्थी करत होते. पण तापसी आणि फोटोग्राफर्स यांच्यात आणखी थोडावेळ वाद झाला. पण अखेर हात जोडत माघार घेत तापसी “तुम्ही नेहमीच बरोबर असता आणि कलाकार नेहमीच चुकीचा असतो. माफ करा.” असं उत्तर देत ती तिथून निघून गेली.

दरम्यान अनुराग कश्यपच्या ‘दो बारा’मध्ये तापसी आणि पावेल ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ‘दो बारा’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिरेज’ या स्पॅनिश चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. येत्या १९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Recommended

Loading...
Share