By  
on  

संजय दत्तने करून दिली बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या भावनांना वाट

बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसैनिकांच्या मनात आदराचं स्थान आहेच याशिवाय, आणखी एका कलाकाराच्या मनात बाळासाहेबांच्या विषयी आदर आहे तो म्हणजे संजय दत्त.

बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित असलेला सिनेमा ‘ठाकरे’ चा ट्रेलर उद्या म्हणजेच २६ डिसेंबरला रिलीज होईल.

या पूर्वसंध्येला बाळासाहेबांविषयी बोलताना संजय म्हणतो, ‘साहेबांची जागा माझ्यासाठी वडिलांसारखी आहे. ते इतरांसाठी लीडर असतील, पण माझ्यासाठी लीडर नाहीत तर टायगर आहेत’.

सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे करत आहेत. पटकथाकार आहेत संजय राऊत. या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा नवाजुद्दिन सिद्दीकी हा अभिनेता साकारत आहे.

https://youtu.be/Zdk-LOM81qs

 

Recommended

PeepingMoon Exclusive