कॉमेडियन राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटर सपोर्टवर ; प्रकृती चिंताजनक

By  
on  

विनोदवीर राजू श्रीवास्तव यांना बुधवारी जीममध्ये व्यायाम करतेवेळी हृदयविकाराचा झटका आला. ज्यानंतर त्यांना तातडीनं दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होणं अपेक्षित असतानाच आता मात्र चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. 

श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून, त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या हृदयामध्ये १०० टक्के ब्लॉकेज आढळल्यामुळं सध्याची परिस्थिती प्रचंड नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे. असं असलं तरीही करण्यात येणाऱ्या सर्व उपचारांना ते व्यवस्थित प्रतिसाद देत असल्यामुळं परिस्थिती नियंत्रणात येईल, अशा आशा डॉक्टरांनी बाळगल्या आहेत. 

५८ वर्षीय राजू श्रीवास्तव यांना बुधवारी सकाळी जिममध्ये वर्कआऊट करताना ते ट्रेडमिलवरून पडले. त्यांच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या आणि ते कोसळले. राजू श्रीवास्तव यांना त्याच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Recommended

Loading...
Share