By  
on  

‘सिंबा’च्या या गाण्यात एकत्र आले सिंबा आणि सिंघम, दोघांनी केली धमाल

रोहीत शेट्टीचा सिंबा रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांना पसंत पडत आहे. सिंघमला लाभलेला प्रेक्षकवर्ग सिंबाला लाभावा अशीच रोहीतची देखील इच्छा आहे. त्यामुळेच कि काय पडद्यावर सिंबाचा जलवा दाखवतानाही त्याला सिंघमचा विसर पडलेला नाही. खास सिंघमच्या चाहत्यांसाठी रोहीतने सिनेमातील एक गाणं अलीकडेच सादर केलं.

या गाण्याचं नाव आहे, ‘मेरा वाला डान्स’. या गाण्यात रणवीर, सारासोबतच ‘द सिंघम’ अजय देवगणही दिसून येईल.
गाण्याच्या सुरुवातीलाच अजय एका एसयुव्हीमधून ‘सिंघम स्टाईलने’ एंट्री मारताना दिसून येतो. त्यानंतर सिंबाचा जीव वाचवल्यानंतर सिंबादेखील त्याला सलाम करतो.
त्यानंतर सुरु होतो सिंबा आणि साराचा दिलखेचक डान्स. या डान्सच्या मध्येमध्ये रणवीर अणि सिंघम यांच्या गुंडासोबतच्या हाणामारीची दृश्यही आहेत.
ट्रेंडी शब्दांसह, दमदार म्युझिकसहित हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे. सिंबा २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive