असा साजरा झाला भाईजान सलमान खानचा वाढदिवस, फॅन्सनीदेखील केलं जोरदार सेलिब्रेशन

By  
on  

सलमानचा वाढदिवस म्हणजे सगळ्या बॉलिवूडचा उत्साह ओसंडून जात असतो. भाईजानच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन फॅन्सकडूनही जोरदार केलं जातं. दरवर्षी २७ डिसेंबरला धुमधडाक्यात भाईजानचा वाढदिवस साजरा केला जातो.

यावर्षीही सलमानचा वाढदिवस जोरदार साजरा झाला. या सेलिब्रेशनसाठी खान कुटुंबिय आधीच पनवेल येथील फार्महाओसवर पोहोचले होते.

भाईजानचा हा ५३ वा वाढदिवस आहे. ५०+ असूनही भाईजानचा फिटनेस मात्र तरुणालाही लाजवेल असा आहे. भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनिल कपूर, कैटरीना कैफ, मौनी रॉय सोहेल खान, सुनील ग्रोवर और जैकलीन फर्नांडिस यांनी हजेरी लावली होती.

 

बर्थडे पार्टी सुरु होण्याआधी सलमानने मिडियासमोर केक कापला. सलमानच्या चाहत्यांनीही त्याला विविध माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करताना सलमानने भाचा आहिलसोबत केक कापला. यावेळी आहिलच्या चेह-यावरील निरागस हावभावांनी प्रत्येकाचंच मन जिंकलं.

https://www.instagram.com/p/Br3jI7uFFQL/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

Share