.jpg)
अजय देवगणचा दृश्यम सिनेमा बराच गाजला. या सिनेमातलं त्याचं पात्र संवांद सारंच हिट ठरलं. आता 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय,
अजयने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘दृश्यम २’चं पोस्टर शेअर करताना लिहिलं, “२ आणि ३ ऑक्टोबरला काय झालं होतं माहीत आहे ना? विजय साळगांवकर त्याच्या कुटुंबासह परत येतोय.” अजयने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये त्याच्यासह त्याची पत्नी आणि मुली दिसत आहे. त्यांच्या समोर महा सत्संग मंदिर आणि पोस्टरच्या एका कोपऱ्यात केस रिओपन असं म्हटलं आहे.
अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. या चित्रपटात अजयसह श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता याच्या दुस-या भागाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.