ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन, आजच प्रदर्शित झाला शेवटचा सिनेमा

By  
on  

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज निधन झाले. ते ७९व्या वर्षांचे होते. पहाटे  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’ आणि ‘पानिपत’यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. वडील, आजोबा अशा भूमिकांमधून ते कायम लक्षात राहिले. एक अनोखा योगायोग म्हणजे त्यांचा अखेरचा चित्रपट नेमका आजच प्रदर्शित झाला.

आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामध्ये अरुण बाली अखेरचे दिसले. त्यानंतर आता त्यांचा आज ‘गुडबाय’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कौटुंबिक सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदानाने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

Recommended

Loading...
Share