By  
on  

'सिंबा' पाहायला आलेल्या प्रेक्षकांना पाहून सैराट झाला रणवीर सिंह

'आला रे आला 'सिंबा' आला.....' हे गाणं काय धमाकेदार आहे ना. पण या गाण्यातली प्रत्यक्ष सिच्युएशन प्रेक्षकांनी नुकतीच अनुभवली आणि त्यांच्यासाठी हे अगदी स्वप्नवतच होतं. त्याला कारणही तसंच होतं. संग्राम भालेराव उर्फ सिंबा म्हणजेच रणवीर सिंह खुद्द अचानकच वांद्रे येथील गेएटी गॅलेक्सी थिएटरमध्ये प्रेक्षकांची सिनेमा पाहिल्यानंतरची प्रतिक्रीया जाणून घ्यायला पोहचला होता. तेथील प्रेक्षकांचा उत्साह आणि सिनेमाला मिळणारा तुफान प्रतिसाद पाहता तो थेट या थिएटरच्या छतावरच चढला.

वांद्रे येथील सर्वात जुन्या आणि प्रसिध्द अशा या थिएटरमध्ये एनर्जीमॅन रणवीरसोबत 'सिंबा' दिग्दर्शक रोहित शेट्टी उपस्थित होता. सिनेमा पाहून जबरदस्त खुश झालेल्या प्रेक्षकांना पाहून दोघंही सैराट झाले आणि 'सिंबा'च्या गाण्यावरच नाचायला लागले. इतकच नव्हे तर तिथे सुरक्षा पाहणा-या उपस्थित ख-या पोलिसांनासुध्दा आपल्यासोबत छतावर बोलवून घेतलं.

आपला लाडका हिरो रणवीर सिंह याला पाहून आला रे आला 'सिंबा' आला...अशीच काहीशी अवस्था झाली  व सिनेमासोबतच ख-याखु-या सिंबा म्हणजेच रणवीर सिंहला पाहण्याचीसुध्दा सरप्राईज भेट घडली.

Recommended

PeepingMoon Exclusive