By  
on  

बहिण जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय श्रीदेवींची धाकटी लेक

अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणजेच श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक हिने बॉलिवूडमध्ये 'धडक' पदार्पण केलं. आता बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत तिची धाकटी बहिण खुशी कपूर बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. जान्हवीला करणच जोहरने लॉंच केलं होतं आणि आता खुशीलासुध्दा लॉंच करण्याची जबाबदारी त्यानेच घेतली आहे.

प्रसिध्द निर्माता करण जोहरच्या 'धडक' सिनेमातून पदार्पण केलेली जान्हवी कपूर आणि ईशान खत्तर ही जोडी प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरली. तर बॉक्स ऑफीसवरसुध्दा हा सिनेमा सुपरहीट ठरला होता. करणने नुकताच 'नो फिल्टर नेहा' शोमध्ये नेहा धुपियाशी बोलताना आपण 2019 मध्ये लॉंच करत असलेल्या स्टारकिड्सचा उल्लेख केला. यात त्याने आपण खुशी कपूर व जावेद जाफरीचा मुलगा मिजान याला लॉंच करत असल्याचे संकेत दिले आहेत.

https://www.instagram.com/p/Bo4qL1bh37l/

आपली फॅशन, हटके स्टाईल याबाबत खुशी बरीच जागरुक असते. बॉलीवुडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये बहिण जान्हवी कपूर आणि वडिल बोनी यांच्याबरोबर खुशी कपूरही आवर्जुन उपस्थित असते. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींचा वारसा त्यांच्या मुली आता पुढे नेतात असं म्हणायला आता अजिबातच हरकत नाही.

https://www.instagram.com/p/BmKvLhMhTgM/

Recommended

PeepingMoon Exclusive