By  
on  

नववर्ष स्वागतासाठी विरुष्का सिडनीला रवाना

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्ष स्वागताची सर्वत्र जोरदार खुप धूम सुरु आहे. सर्वांनीच यासाठी सेलिब्रेशनचे जोरदार प्लॅन्स तयार केले आहेत. मग सेलिब्रिटींची तर यात बातच न्यारी. असाच एक छान आणि रोमॅंटीक प्लॅन भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली व त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांनी आखला आहे. दोघांनाही आपल्या बिझी शेड्यूलमधून एकमेकांसाठी फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे नववर्षाचं स्वागत एकत्र करण्याची संधी हे स्टार कपल हातची गमावू शकत नाही.

ऑस्ट्रेलिया येथील टेस्ट सिरीजनंतर पुढील मॅचसाठी विराट सिडनीसाठी रवाना झाला आहे. तेथे त्याची पत्नी अनुष्कासुध्दा त्याला जॉईन झाली आहे. आपल्या पत्नीसोबतचा एक गोड फोटो सोशल मिडीयावर शेअर करत विराटने लिहलंय, मी आणि अनुष्का नववर्षासाठी सिडनीला निघालो आहे. यंदा नवीन वर्षाचं स्वागत मी माझी पत्नी अनुष्कासोबत करणार आहे.

https://www.instagram.com/p/BsCN2LNg86Y/

 

Recommended

PeepingMoon Exclusive