By  
on  

असा आहे,अजय देवगणचा तानाजी मालसुरेंच्या भूमिकेतील फर्स्ट लुक

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या महत्त्वकांक्षी आणि बहुचर्चित ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. या सिनेमातील तानाजी मालसुरे यांच्या भूमिकेतील अजय देवगणचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हील झाला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशीच अजय देवगणच्या या लूकची भेट हर हर महादेव म्हणत, ओम राऊतने ट्विटरवरुन शेअर केली आहे. सर्वांनाच अजयचा शूरवीर तानाजी मालसुरे यांच्या

https://twitter.com/omraut/status/1080104703596335104

महत्त्वाचं म्हणजे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणा-या शिवाजी महाराजांना या संघर्षात अनेक शिलेदारांची मोलाची साथ लाभली. त्यापैकी शूरवीर योध्दे तानाजी मालुसरे यांचा सिंहाचा वाटा होता. ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजी मालुसरे यांच्या तडफदार भूमिकेत खुद्द अजय देवगणलाच पाहायला मिळणार आहे. तर या बिग बजेट सिनेमात बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकारसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याची एक जबरदस्त चर्चा रंगलीय.सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत तर काजोल तानाजी मालसुरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत असल्याची चर्चा रंगली आहे. अद्यापही सिनेमातील विविध महत्त्वपूर्ण भूमिकेतील कलाकारांच्या नावाचा अद्याप उलगडा झालेला नाही.

महाराष्ट्राच्या मातीतल्या इतिहासातील या घटनेची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमात कोणते मराठी कलाकार भूमिका साकारणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. आता अजिंक्य देव यांच्यानंतर आणखी कोणते मराठी कालाकार यात झळकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive