By  
on  

दीपिका पदुकोण डोसा खायचाय? मग अमेरिकेला जावं लागेल

सिनेस्टार्सचे चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रेटींसाठी काय करतील याचा नेम नाही. कुणी आवडत्या हिरो किंवा हिरॉईनसारखी स्टाईल करतो, कुणी त्यांच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतं, कुणी त्यांची एक झलक दिसावी म्हणून तासनतास वाट पहातं तर कुणी आवडत्या सेलिब्रिटीचे फोटो गोळा करतं.

पण अमेरिकेतील एका फॅनने मात्र चक्क दीपिका पदुकोणच्या नावाचा डोसा बनवला आहे. विशेष म्हणजे हा डोसा हॉटेलच्या मेन्युकार्डमध्ये आहे. हा डोसा टेस्ट करायचा असेल तर तुम्हाला दहा डॉलर्स म्हणजे जवळपास सातशेच्या आसपास चार्ज पडेल.

 

अमेरिकेतील भारतीयाने दीपिका च्या नावच्या डोसा बनवला तर एका पुणेकराने दीपिका पदुकोण नावाचा पराठा बनवला आहे. हा पराठा जवळपास ६०० रुपयांना आहे.

विशेष म्हणजे दीपिकालाही हे मेन्यु कार्ड इतकं आवडलं की ‘नवीन वर्षाची इतकी चांगली सुरुवात’ या कॅप्शनखाली तिने ते पोस्टदेखील केलं. आता दीपिकाचे चाहते मात्र डोसा खावा कि पराठा या चिंतेत पडले नाहीत म्हणजे मिळवलं.

Recommended

PeepingMoon Exclusive