By  
on  

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर लवकरच बोहल्यावर चढण्याची शक्यता

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या कपलच्या अफेअरच्या चर्चांनंतर आता आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे. ते म्हणजे शिबानी आणि फरहान लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. हे दोघं नेहमीच एकत्र हिंडताना स्पॉट होतात. कधी तर परदेशातही हया नव्या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते.

दीपिका-रणवीरच्या बहुचर्चित रिसेप्शन पार्टीत फरहान आणि शिबानी हे एकत्रच उपस्थित होते. तेव्हा तर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरुनच त्यांच्या नात्याबाबत सर्वांना चांगलीच कल्पना आली होती. तसंच ते आत्ता खुल्लम खुल्ला एकत्र हिंडतात. म्हणून लवकरच ते आपल्या नात्याला अधिकृतचं शिक्कामोर्तब करण्यासाठी बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतील अशी चर्चा आहे.

शिबानी नुकतीच नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त फरहानची मुलं आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना या फोटोत पाहायला मिळत आहेत. शिबानीसोबत फरहानच्या मुलाचं ट्युनिंग छान जुळत असल्याने लवकरच ते पुढचं पाऊल उचलणार असल्याचे समजते.

फरहान अख्तरने 2017 साली पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतला. या दोघांना दोन मुलं आहेत.

 

https://www.instagram.com/p/BsFbQ6YBNsH/?utm_source=ig_embed

Recommended

PeepingMoon Exclusive