By  
on  

रोहित शेट्टीने केलेला हा विक्रम तुम्हाला माहितीय का?

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे सिनेमे म्हणजे मनोरंजन, एक्शन आणि ड्रामाने भरलेलं खच्चून पॅकेज. सिनेमागृहात जाऊन त्याचे  सिनेमे पाहणं म्हणजे, मनोरंजनाची हमखास गॅरण्टी. हेच त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिंबाने पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणि बॉक्स ऑफीसवर सिध्द करुन दाखवलं आहे.

रणवीर सिंह आणि सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या सिंबाने पाच दिवसांत तब्बल १२४ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे १०० कोटी रूपये कमवणारा रोहित शेट्टीचा हा आठवा सिनेमा ठरला आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातून चोहोबाजूंनी रोहितवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशी दमदार कामगिरी करणारा रोहित शेट्टी हा पहिलाच दिग्दर्शक ठरला आहे.

https://twitter.com/RanveerOfficial/status/1080404795968516096

निर्माता करण जोहरनेसुध्दा रोहितचं कौतुक करत ट्विट केलं आहे, मसलापट तयार करण्यात रोहित अग्रेसर आहे. यात त्याचा हात कोणच धरु शकत नाही. तर रणवीर म्हणतो, रोहित ‘ब्लॉकबस्टर किंग’  आहे.

https://twitter.com/RanveerOfficial/status/1080404795968516096

गोलमाल, चेन्नई एक्सप्रेस, गोलमाल अगेन, दिलवाले, बोलबच्चन, सिंघम, सिंघम रिटर्न्स आणि आता सिंबा हे रोहित शेट्टीचे  आत्तापर्यंतचे ब्लॉकब्लस्टर सिनेमे आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, रोहित शेट्टीचा सुपर-डुपरहिट सिंबा सिनेमा रणवीर आणि सारासोबतच  सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर, आणि सिध्दार्थ जाधव या मराठी कलाकारांच्या मादियाळीने सजला.

Recommended

PeepingMoon Exclusive