तुनिषा शर्मानंतर या सोशल मिडीया स्टार तरुणीने संपवलं आपलं जीवन

By  
on  

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्या प्रकरणाला अवघे दोन-तीन दिवस उलटून गेले तोच आणखी या सोशल मिडीया इन्फ्ल्युएन्सर तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. सोशल मीडिया स्टार लीना नागवंशीने आत्महत्या केली आहे. छत्तीसगड जिल्हातील विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या लीनाने घरातच गळफास घेत जीवन संपवले. ती २३ वर्षांची होती. बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात लीना शिकत होती.

लीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. रील्स व व्हिडीओमधून तिला लोकप्रियता मिळाली होती.

२६ डिसेंबरला लीना दुपारी बाजारात गेली होती. बाजारातून घरी परतल्यावर लीना रुममध्ये नसल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं. लीनाला पाहण्यासाठी तिची आई घराच्या गच्चीवर गेली असता दरवाजा बाहेरुन बंद दिसला. बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने कुटुंबियांनी गच्चीचा दरवाजा तोडला. तेव्हा गच्चीवरील एका पाईपाला गळफास घेत लीनाने आत्महत्या केल्याचं आढळलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP